गौरीच्या मुखवट्यांना मोफत रंगकाम!

गौरीच्या मुखवट्यांना मोफत रंगकाम!

| Updated on: Sep 03, 2022 | 1:54 PM

अनेक लोकं गणपतीच्या काळात अनेक पद्धतींची कामं करतात जसं की अन्नदान. सोलापूरातील माढ्यात जुन्या गौराईना रंग देण्याचं काम करतायत.

गणपती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय. कोरोना काळात लोकांना सगळ्यात जास्त उणीव भासली असेल तर ती आहे सणांची. भारतात सणवाराला जास्त महत्त्व आहे. कोरोना काळात याचीच कमतरता होती. सार्वजनिक उत्सवांवर बंदी होती. पण यावर्षी मात्र गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालंय. अनेक लोकं गणपतीच्या काळात अनेक पद्धतींची कामं करतात जसं की अन्नदान. सोलापूरातील माढ्यात जुन्या गौराईना रंग देण्याचं काम करतायत. हा कलाकार माणूस गौरीच्या मुखवट्यांना मोफत रंग देतो. गेल्या दहा वर्षांपासून हा कलाकार माणूस हे काम करतोय. या व्यक्तीची चांगलीच चर्चा आहे.

 

 

Published on: Sep 03, 2022 01:53 PM