Ganeshotsav 2022: नागपुरात मुस्लिम कुटुंबियांच्या घरी होते बाप्पांची स्थापना, हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे प्रतीक
खान यांच्या कुटुंबियांत एकीकडे नमाज पठण होतं तर दुरीकडे बाप्पांची आरती होते. हिंदू मुस्लिम ऐक्याचे हे प्रतीक पाहण्यासाठी बरेच लोकं येत असल्याचे सोहेल खान यांनी सांगितले.
गणेशोत्सव हा हिंदूंचा सण मानला जातो मात्र नागपुरात एक मुस्लिम कुटुंबीय गेल्या 10 वर्षांपासून चक्क गणपती बाप्पाची स्थापना करीत आहेत. नागपुरातील सोहेल खान यांच्या घरी गेल्या 10 वर्षांपासून विधीवतपणे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. सोहेल खान यांचा मुलगा लहान असताना गणेशोत्सवात सहभागी व्हायचा. बाप्पांप्रती त्याच्या मनात श्रद्धा होती. त्याने घरी गणपती बसविण्याची आपली इच्छा कुटुंबियांना बोलून दाखविली. सोहेल खान यांनी देखील कुठलाच विरोध न करता यासाठी होकार दिला. खान यांच्या कुटुंबियांत एकीकडे नमाज पठण होतं तर दुरीकडे बाप्पांची आरती होते. हिंदू मुस्लिम ऐक्याचे हे प्रतीक पाहण्यासाठी बरेच लोकं येत असल्याचे सोहेल खान यांनी सांगितले.
Published on: Sep 03, 2022 12:01 PM
Latest Videos