“नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नव्हता”, सदावर्ते पुन्हा बरळले; नेमकं प्रकरण काय? पाहा स्पेशल रिपोर्ट
वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वकीलीची सनद रद्द झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर सदावर्ते समोर आले. नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नव्हता”, असं वक्तव्य सदावर्तेंनी केलं.
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वकीलीची सनद रद्द झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर सदावर्ते समोर आले. नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नव्हता”, असं वक्तव्य सदावर्तेंनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला. त्यांच्या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आला होता. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी सदावर्तेंच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. नेमकं या पत्रकार परिषदेत काय घडलं यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…