बीडच्या तरुणाकडून थेट लग्नाची मागणी अन् गौतमी पाटील स्पष्टच बोलली…
VIDEO | बीडच्या गलांडे पाटील या तरुणाकडून गौतमी पाटील हिला लग्नाची मागणी, गौतमी काय म्हणाली?
पंढरपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला पत्र लिहीत थेट थेट लग्नाची मागणी घातली. यावर गौतमी पाटील हिनं थेट पंढरपुरात उत्तर दिलं आहे. नृत्यांगणा गौतमी पाटील ही नेहमी तिच्या नृत्याच्या अदांनी चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाच्या तारखाही बूक असतात. या व्यस्त कार्यक्रमातून ती पंढरपुरात दिसली. यावेळी तिने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. श्री विठ्ठलाचा आशीर्वाद असाच राहावा असे मागणी घातल्याचं तीनं सांगितलं. यावेळी बीडच्या गलांडे पाटील या तरुणाने गौतमी पाटील हिला जाहीर लग्नाची मागणी घातली. त्यावर तिनं भाष्य केलं. सध्या तरी लग्नाचा विचार नाही. कोणीही काही बोललं तर कसं लक्ष देणार, असंही गौतमी पाटील हिने सांगितले. तर “गौतमी तुझ्या इच्छा अटी सर्व मान्य, बोल तू होती का माझी परी..” असं म्हणत आपल्या घराचा पत्ता देत लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असं या पठ्ठ्यानं थेट म्हटलंय.