नादखुळा! गौतमी पाटीलच्या अदाकारीने पिंपरी-चिंचवडकर घायाळ, कार्यक्रमात तरुण, तरुणींसोबत लहान मुलेही थिरकले!
नृत्यांगना गौतमी पाटीलने पिंपरी-चिचडवडकरांची मने जिंकली आहेत.पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे अमित लांडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.
पिंपरी चिंचवड : नृत्यांगना गौतमी पाटीलने पिंपरी-चिचडवडकरांची मने जिंकली आहेत.पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे अमित लांडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. तिने काही गाण्यांवर नृत्य करत उपस्थित महिला, तरुण -तरुणीची मने जिंकत मनोरंजन केलं. यावेळी कार्यक्रमाला आलेल्या लहान मुलांनाही नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. याआधीही गौतमी पाटीलच्या काही कार्यक्रमांमध्ये गोंधळ झाल्याचे प्रकार घडले .परंतु पिंपरी चिंचवडमध्ये गौतमी पाटील हिचा कार्यक्रम गोंधळाविना पार पडला. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होणार होती. यामुळे यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला. खासगी सुरक्षारक्षकही होते. यामुळे गौतमी पाटील हिचा कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही. सर्व जणांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.