गीता जैन यांना पुन्हा राग अनावर; आधी अभियंताच्या कानशीलात आणि आता थिएटरमध्ये…पाहा काय झालं?
काही दिवसांपूर्वी आमदार गीता जैन यांनी एका अभियंत्याला कानशिलात लगावल्याचं समोर आलं होतं. याचा घटनेचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | काही दिवसांपूर्वी आमदार गीता जैन यांनी एका अभियंत्याला कानशिलात लगावल्याचं समोर आलं होतं. याचा घटनेचा व्हिडीओ समोर आला होता. पावसाळ्यात अतिक्रमण विरोधात कारवाई केल्याने आमदार संतापल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. तांत्रिक बिघाडामुळे नाटकाला उशिर झाल्यामुळे गीता जैन थिएटरच्या बुकिंग कर्मचाऱ्यावर चांगल्याच संतापल्या. “हे धंदे करता का तुम्ही लोकं नाट्यगृह चालवायचे? ज्यांना पाचचा वेळ दिला त्यांना साडेसहापर्यंत थिएटर देत नाही. मला कुणाशीही बोलायचं नाही. तुम्ही मला लिहून द्या की, साडेसहाला हॉल दिलाय. मला कुणाशीच बोलायच नाहीय”, अशा शब्दांत गीता जैन संतापल्या. नेमकं हे प्रकरण काय यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 08, 2023 07:41 AM
Latest Videos