Abdul Sattar : मंत्रिपद मिळाले आता खात्याबाबत आशादायी नाही, जनतेची कामे हाच ध्यास
सर्वांना विश्वासात घेऊन शिंदे हे काम करतील असा विश्वास असल्याचे सत्तार यांनी सांगितले आहे. संजय शिरसाठ आणि आम्हीच शिवसेना आहोत मग शिरशाठ शिवसेनेचा वाटेवर कसे आसणार असा सवाल त्यांनी उपस्थि केला. शिवाय मंत्रिपदाबाबत यावेळी खऱ्या अर्थाने न्याय मिळाले आहे.
औरंगबाद : अखेर मंत्रिपद मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार हे आपल्या मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत. टीईटी प्रकरणामुळे सत्तारांच्या मंत्रिपदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. आता खाते कोणतेही दिले तरी जनतेची सेवा करायची आहे. त्यामुळे खात्याबाबत कोणतीही अपेक्षा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कोणी नाराज ते राहणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन शिंदे हे काम करतील असा विश्वास असल्याचे सत्तार यांनी सांगितले आहे. संजय शिरसाठ आणि आम्हीच शिवसेना आहोत मग शिरशाठ शिवसेनेचा वाटेवर कसे आसणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवाय मंत्रिपदाबाबत यावेळी खऱ्या अर्थाने न्याय मिळाले आहे. यापूर्वी बोटावर मोजण्याइतपतच मंत्री असायचे ते सर्व पदे ही काही निवडक नेत्यांच्या नात्यागोत्यातले असे म्हणत सत्तारांनी विरोधकांना टोला लगावला आहे.