Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ghod Dam | शिरुरमधील घोड धरण 75 टक्के भरले, गावांना सतर्कतेचा इशारा

Pune Ghod Dam | शिरुरमधील घोड धरण 75 टक्के भरले, गावांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Jul 25, 2022 | 11:47 AM

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील घोड धरण 75 टक्के भरले असून धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणातून २६०० क्युसेक्स ने घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील घोड धरण 75 टक्के भरले असून धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणातून २६०० क्युसेक्स ने घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे,धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.यंदा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाल्याने शिरूर श्रीगोंदा कर्जत तालुक्यांसाठी नंदनवण ठरलेल्या घोड धरणाच्या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. खेड आंबेगाव शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील शिवारातील जमिनी उपळल्या आहेत. उभ्या पिकातून पाणी वाहत आहे. शेतांमध्ये तळी साठली असून सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग आणि तरकारी, भाजीपाला पिके कुजून पिवळी पडू लागली आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे.