ठाण्यातील बिझनेस पार्कमधील आगीची होणार चौकशी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेवर टीका केली होती. त्याचबरोबर आमदार निरंजन डावखरे यांनी आगीचं नेमकं कारण काय हे तपासून यात दोषी आढळल्यास कारवाई करू असे संकेत दिले होते.
ठाणे : घोडबंदर रोडवरील वंडर मॉलजवळील ओरियन बिझनेस पार्कला भीषण आग लागली होती. या आगीत लाखो रूपयांचे निकसान झाले. तर आग इतकी भयानक होती की ती रात्रभर सुरू होती. तब्बल 10 तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेवर टीका केली होती. त्याचबरोबर आमदार निरंजन डावखरे यांनी आगीचं नेमकं कारण काय हे तपासून यात दोषी आढळल्यास कारवाई करू असे संकेत दिले होते. यानंतर आता महापालिका प्रशासनास जाग आली आहे. आगीनंतर येथील व्यापाऱ्यांच्या संकुलनाचे पालिकेकडून फायर ऑडिट आणि चौकशी केली जाणार आहे.
Published on: Apr 20, 2023 10:27 AM
Latest Videos