वसंत तात्यांना लाल दिव्याची गाडी भेट. दिव्याचं काय केलं? वसंत मोरे म्हणाले…
वसंत मोरेंच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी दिली लाल दिव्याची ॲम्बेसिडर गिफ्ट दिली. अखिल मोरे बाग मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाडी भेट दिली. पुण्यात खासदारकीसाठी वसंत मोरे यांचे नाव चर्चेत आहे. वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर वसंत मोरेंचा भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आलाय.
पुणे : 10 ऑक्टोबर 2023 | आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढविणार आहे. 15 किंवा 16 तारखेला बारामती लोकसभा ऑफीसचे उदघाटन राज ठाकरे करणार आहेत अशी माहिती मनसे नेते वसंत मोरे यांनी दिली. मी पुणे लोकसभेसाठी आहे. मला तिकीट दिलं तर मी निवडणूक लढणार आहे. पक्ष वाढीसाठी मी बारामती लोकसभेत काम करत आहे. येणाऱ्या काळात लोकसभा निवडणूकसाठी बैठकी होतील. मी पुणे लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. आज वाढदिवस नसता तर खेड शिवापूर टोल नाका बंद केला असता. या अगोदर माझ्यावर दोनदा खेड शिवापूर टोल नाक्याबाबत केस झाल्या आहेत. आता टोल नाक्यावर जाऊ नका असा पक्षाचा आदेश आहे. जोपर्यंत पक्ष आदेश येत नाही तोवर टोल नाक्यावर जाणार नाही. आदेश आल्यावर पुन्हा टोल नाक्यावर धडक देणार असे त्यांनी सांगितले. माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यानी हौस म्हणून लाल दिव्याची गाडी दिली होती. मी तातडीनं तो दिवा काढून टाकला असेही त्यांनी सांगितले.