Girish Mahajan : 17 ऑगस्टच्या अधिवेशनापूर्वी खातेवाटप, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
Girish Mahajan : कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर महाजन पहिल्यांदाच जळगावमध्ये आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलंय. तर खातेवाटपाची तारीखही सांगितली.
जळगाव : 17 ऑगस्टच्या अधिवेशनापूर्वी खातेवाटप होणार असल्याची माहिती शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जळगावात दिली. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर म्हणजेच कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर महाजन पहिल्यांदाच जळगावमध्ये आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रखडला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. मात्र, तरीही नाराजी कायम दिसली. एकनाथ शिंदे यांच्या गटासह भाजपमध्ये देखील नाराजी दिसून आली. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे आता पुढे पुन्हा कुणाला मंत्रीपद मिळणार, पालकमंत्री कोण होणार, याकडे देखील लक्ष लागून आहे.