थोडी सबुरी ठेवावी…आरक्षणाचं काम अंतिम टप्प्यात, गिरीश महाजन यांचं जरांगे यांना कळकळीचं आवाहन

| Updated on: Jan 20, 2024 | 5:32 PM

मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा येत्या २६ जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. अशातच राज्याचे ग्रामविकास आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती देत मनोज जरांगे पाटील यांनी संयम बाळगावा असे आवाहनही केले आहे.

मुंबई, २० जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो मराठ्यांसह मनोज जरांगे पाटील हे आज जालन्यातील अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला असून येत्या २६ जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. अशातच राज्याचे ग्रामविकास आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती देत मनोज जरांगे पाटील यांनी संयम बाळगावा असे आवाहनही केले आहे. पुढे ते असेही म्हणाले की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी थोडी सबुरी ठेवावी आणि आपला मोर्चा मुंबईत आणू नये, असे कळकळीचे आवाहनही गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.

Published on: Jan 20, 2024 05:32 PM
आले होते जरांगेंना समजवायला, स्वत:च मोर्चात सामील होणार; सरकारमधील नेत्यानंच घेतला मोठा निर्णय
मराठा आरक्षणासाठी मुंबईत येण्यावर जरांगे ठाम, अन् सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; पडद्यामागे घडतंय काय?