‘रोज काहीतरी बोलल्याशिवाय संजय राऊत यांना भूक आणि झोप लागत नाही’, कुणी केली बोचरी टीका
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर दबाव असल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळातून कुणी केली
नांदेड : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर दबाव असल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली जात आहे. अशातच त्यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी राऊत हे अदखल पात्र असल्याचा दावा केला आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी संजय राऊत रोज काहीतरी नवीन बोलत असतात, असेही महाजन म्हणाले आहेत. रोज काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना भूकही लागत नाही आणि झोपही येत नाही, त्यामुळे त्यांच्यावर खुलासा केला पाहिजे असं मला वाटत नाही, असंही महाजन म्हणाले आहेत. दरम्यान, आज नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केलीय, आज मुदखेड तालुक्यातील विविध गावांच्या शिवारात पालकमंत्री सर्व अधिकाऱ्यांना घेऊन दाखल झाले. मुदखेड तालुक्यातील कलिंगड, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री महाजन यांनी पाहणी केली.