Girish Mahajan | पंकजा मुंडेंच्या पदाबाबत पक्षश्रेष्ठी विचार करतील, गिरीश महाजन यांचे वक्तव्य
Girish Mahajan | पंकजा मुंडे यांच्या पदाबाबत पक्षश्रेष्ठी विचार करतील, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे.
Girish Mahajan | पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या पदाबाबत पक्षश्रेष्ठी विचार करतील, असे वक्तव्य गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठं पद मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिपदासाठी सातत्याने पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा करण्यात येते. मात्र मंत्रिपद देताना त्यांचा पत्ता कट करण्यात येतो, याविषयी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. मंत्रिपदासाठी (Ministry) कदाचित आपली तेवढी पात्रता नसेल, माझी पात्रता ज्यावेली वाढेल, त्यावेळी मंत्रिपद देतील असे खोचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा रोख कोणाकडे होता, हे वेगळं सांगायला नको. या वक्तव्यावर गिरिश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय मानण्यात येतात. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेला महत्व प्राप्त झाले आहे.