अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री? गिरीश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल मिटकरी यांनी शुभेच्छा देणारं ट्विट केलं होतं. यावेळी त्यांनी लवकरच अजित पर्व सुरु होणार, असं आशयाचं ट्विट केलं होतं. अमोल मिटकरी यांच्या ट्विटने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव, 23 जुलै 2023 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल मिटकरी यांनी शुभेच्छा देणारं ट्विट केलं होतं. यावेळी त्यांनी लवकरच अजित पर्व सुरु होणार, असं आशयाचं ट्विट केलं होतं. अमोल मिटकरी यांच्या ट्विटने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देतील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील. या सर्व कपोलकल्पित गोष्टी आहेत, मनघडण कहाण्या आहे. आम्ही 2024 च्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. याबाबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी याआधीही खुलासा केला आहे. मात्र काही कार्यकर्ते हौशी असतात. ते आपले नेत्यांचे अशा प्रकारचे बॅनर लावत असतात, हा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. आमचे छोटे ठाकरे त्यांचेही मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लागतात. नाना पटोले यांचेही लागत आहेत. मी मुख्यमंत्री अशी स्पर्धा तयार झालेली आहे.”