मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? गिरीश महाजन म्हणतात, “दिल्लीतून ग्रीन सिग्नल…”
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या बैठकीत शिवसेनेतील चार ते पाच मंत्र्यांना डच्चू द्यावा, असे सांगितल्याचे समजते. या पाच मंत्र्यांऐवजी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करावा, यासाठी भाजपकडून शिवसेनेवर दबाव असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या बैठकीत शिवसेनेतील चार ते पाच मंत्र्यांना डच्चू द्यावा, असे सांगितल्याचे समजते. या पाच मंत्र्यांऐवजी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करावा, यासाठी भाजपकडून शिवसेनेवर दबाव असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसेनेच्या पाच मंत्र्यांचा अहवाल भाजपाने मागवला या सर्व खोट्या बातम्या आहेत. अशा पद्धतीच्या बातम्या कुठून तरी पेरल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा अधिकार हा वरिष्ठांचा आहे. दिल्लीवरून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय घेतील. मंत्री मंडळाचा विस्तार हा लवकरच होईल, असं मला वाटतं. मंत्री पदावरून कोणाला काढा, असं भाजपने कुठेही म्हटलेलं नाही. असा कोणताही अहवाल भाजपने मागवलेला नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.