अजित पवार यांच्या बंडावर भाजप नेता म्हणतो, “जे शिवसेनेत झालं, तेच राष्ट्रवादीत होणार”
अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे. शरद पवार यांच्यासमोर शिवसेनेप्रमाणे पेच निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.
जळगाव: अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे. शरद पवार यांच्यासमोर शिवसेनेप्रमाणे पेच निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना ज्याप्रमाणे चिन्हापासून सुरुवात करावी लागली, त्याचप्रमाणे शरद पवारांना आता नव्याने पक्ष उभारणी करावी लागेल. नव्याने संघटना उभी करावी लागेल. त्यासाठी ते प्रयत्न करताय चांगलं आहे. त्यांच्या पक्षाचा, चिन्हाचा निर्णय अजून आलेला नाही. पण बहुसंख्य आमदार आज अजित पवारांकडे आहेत. शरद पवारांकडे फक्त आठ-दहा आमदार शिल्लक आहेत. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं, कार्यालय कुणाचं, अशी लढाई आता सुरू होईल. जे शिवसेनेत झालं तेच आता राष्ट्रवादीत होईल.”
Published on: Jul 09, 2023 11:58 AM
Latest Videos