Girish Mahajan : पंकजा मुंडेंना मोठं पद मिळेल, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
'पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या हे मी बघितलं नाही. पंकजाताई यांची कुठेही नाराजी आहे, असं मला वाटत नाही. पक्षश्रेष्टी त्यांच्यावर गांभीर्यानं विचार करतील, असं गिरीश महाजन म्हणालेत.
जळगाव : शिंदे-फडणवीस सरकारचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाजपच्या (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर जळगावमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी कॅबिनेटमंत्री महाजन म्हणाले की, ‘माजी मंत्री पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या हे मी बघितलं नाही. पंकजाताईंची कुठेही नाराजी आहे, असं मला वाटत नाही. पक्षश्रेष्टी त्यांच्यावर गांभीर्यानं विचार करतील. त्यांनाही मोठं पद मिळेल. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज आहे, असं म्हणण्याचं कारण नाही. यावेळी 17 ऑगस्टच्या अधिवेशनापूर्वी खातेवाटप होणार असल्याची माहिती शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जळगावात दिली. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर म्हणजेच कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर महाजन पहिल्यांदाच जळगावमध्ये आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.