मुंबईत तरुणीची हत्या; पीडितेच्या वडिलांना अश्रू अनावर, हॉस्टेल प्रशासनावर केला आरोप!
चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेत ज्याच्यावर संशय होता तो सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
मुंबई: चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेत ज्याच्यावर संशय होता तो सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी वसतिगृहाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या मुलीला वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर एकटीला एकाच रूममध्ये ठेवलं होतं. तिच्यासोबत दुसऱ्या कोणत्याही मुली ठेवल्या नाहीत. का नाही इतर मुली ठेवल्या? सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी हॉस्टल निवडलं.पंजाबराव देशमुख हॉस्टेलमध्ये निवड झाली होती, पण तिकडे मुलं-मुली दोन्ही होते म्हणून सरकारी हॉस्टेल निवडलं. होस्टेल प्रशासनाला सहआरोपी करा. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. वॉर्डने मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. 8 तारखेला घरी येण्यासाठी रिजर्वेशन केलं होतं. 6 तारखेला पहाटे ही घटना झाली. दिवसभर मुलीने फोन नाही उचलला मग, तिच्या मैत्रिणीला फोन केला. तिनी सांगितलं रुमला बाहेरून लॉक आहे, पण मुलगी बाहेर गेली नाही. मग वॉर्डला फोन केला वॉर्डने सांगितलं पोलिसांना बोलवावं लागेल, तुम्ही ही इकडे या, याला दोषी अंधारे मॅडम आणि कोळी मॅडम आहेत”, अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली.