Arjun Khotkar on Danve | 'दानवेंना म्हटलं, यावेळी मला लोकसभा लढू द्या' खोतकरांची इच्छा, दानवेंची अडचण

Arjun Khotkar on Danve | ‘दानवेंना म्हटलं, यावेळी मला लोकसभा लढू द्या’ खोतकरांची इच्छा, दानवेंची अडचण

| Updated on: Jul 30, 2022 | 4:25 PM

Arjun Khotkar on Danve | अर्जुन खोतकर यांनी पुन्हा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

Arjun Khotkar on Danve | ‘दानवेंना म्हटलं, यावेळी मला लोकसभा लढू द्या’ अशी मनातली इच्छा शिंदे गटात (Shinde Group) सहभागी झालेले अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली. दोन-तीन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या निवासस्थानी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची बैठक झाली. खोतकर यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. त्यावेळीच अर्जुन खोतकर हे शिवसेना सोडणार हे पक्कं झालं होते. त्यांनी आज जालना येथे पत्रकार परिषद घेऊन या शक्यतेवर शिक्कामोर्तब केले. ईडीची(ED) कारवाई टाळण्यासाठी ही दिलजमाई झाल्याचा आरोप शिवसेनेतून (Shiv Sena) करण्यात येत आहे. तर अडचणीत माणूस सहारा शोधत असतो, अशी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि उद्याचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे खोतकर यांनी सांगितले.

खोतकर यांनी यापूर्वी ही जालना लोकसभा मतदार (Lok Sabha Election) संघात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे गटात जाण्यासाठी त्यांनी लोकसभेची उमेदवारी ही प्रमुख अट घातल्याचे स्पष्ट झाले असले तरी नेमकं आता पुढं काय घडामोडी घडतात हे स्पष्ट होईलच. पण खोतकर यांचा लोकसभेचा आग्रहक कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.