आझाद मैदानात जा, पोलिसांनी नाना पटोलेंना अडवलं; पोलीस आणि पटोलेंमध्ये काय संवाद झाला?

आझाद मैदानात जा, पोलिसांनी नाना पटोलेंना अडवलं; पोलीस आणि पटोलेंमध्ये काय संवाद झाला?

| Updated on: Feb 14, 2022 | 12:44 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने भाजप कार्यालयाबाहेर आंदोलनाचा सपाटा सुरू केला आहे.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने भाजप कार्यालयाबाहेर आंदोलनाचा सपाटा सुरू केला आहे. आज काँग्रेसने (Congress) थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सागर निवासस्थानाकडे जात असतानाच पोलिसांनी पटोले यांना अडवलं आहे. तुम्हाला आंदोलन करता येणार नाही. आझाद मैदानात जा, असं पोलिसांनी पटोले यांना सांगितलं. तर, आम्हाला फक्त मेसेज द्यायचा आहे. आम्ही आहे तिथून आंदोलन करू. आझाद मैदानात जाणार नाही, असं नाना पटोले यांनी पोलिसांना निक्षून सांगितलं आहे. तसेच पटोलेंनी वारकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Published on: Feb 14, 2022 12:44 PM