संजय राऊत दुसऱ्या पक्षाचे, त्यांची भूमिका वेगळी असू शकते, पण...; नाना पटोले यांचं महत्वपू्र्ण वक्तव्य

संजय राऊत दुसऱ्या पक्षाचे, त्यांची भूमिका वेगळी असू शकते, पण…; नाना पटोले यांचं महत्वपू्र्ण वक्तव्य

| Updated on: Apr 08, 2023 | 2:49 PM

Nana Patole : नरेंद्र मोदी यांना अदानी विरोधात जेपीसी लावण्यात अडचण काय आहे? शरद पवार त्यांनी अदानी समूहाची पाठराखण केली. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

गोंदिया : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद नाही असे बोलले होते. त्यावर नाना पटोले यांनी उत्तर देत त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे त्यांची भूमिका काय ते त्यानांच माहिती, आम्ही शिवाजी महाराज यांना मानणारे लोक आहोत, असं नाना पटोले म्हणाले आहेत. अदानीने देशातील जनतेचा पैसा खाललाय. त्यामुळे काँगेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. प्रधानमंत्री जेपीसी लवण्यामध्ये मोदी यांना अडचण काय आहे? तर मोदी व अदानी यांचे संबंध जनतेला माहिती आहेत. त्यामूळे वेगळा सांगण्याची गरज नाही. तर दुसरीकडं शरद पवार यांनी अडणीची बाजू घेतली आहे. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असावा पवारसाहेब स्वतः केंद्रात राहिलेले आहेत. त्यांना चांगलं माहिती असावं, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

Published on: Apr 08, 2023 02:49 PM