Shiv Sena : गोंदियाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांची हकालपट्टी
गोंदियाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू (Surendra Naidu) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सोबतच सहसंपर्कप्रमुख मुकेश शिवहरेंनाही पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
गोंदिया : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. एक मोठा आमदारांचा गट शिवसेनेतून शिंदे गटात सामील झाला. आमदारानंतर अनेक खासदार देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या बंडानंतर शिवसेनेकडून सावध पाऊलं उचलण्यात येत आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेकडून कारवाई करण्यात आली आहे. गोंदियाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सोबतच सहसंपर्कप्रमुख मुकेश शिवहरेंनाही पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत या दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Published on: Jul 21, 2022 09:52 AM
Latest Videos