सांगलीत दसरा मेळावा घेणार, गोपीचंद पडळकर यांची घोषणा

“सांगलीत दसरा मेळावा घेणार”, गोपीचंद पडळकर यांची घोषणा

| Updated on: Sep 28, 2022 | 4:47 PM

सध्या सर्वत्र दसरा मेळाव्याची चर्चा आहे. अश्यात आता विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनीही दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे.

शंकर देवकुळे, TV9 मराठी, प्रतिनिधी, सांगली : सध्या सर्वत्र दसरा मेळाव्याची चर्चा आहे. अश्यात आता विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनीही दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्याची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यातील आरेवाडीमध्ये आपण मेळावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2 ऑक्टोबरला आरेवाडीत दसरा मेळावा घेणार आहे. धनगर समाजाचे आराध्या दैवत असलेल्या आरेवाडीमध्ये मेळावा होणार आहे. धनगर समाजाचे प्रश्न आणि अडचणींवर या मेळाव्यात चर्चा होणार आहे, असं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले आहेत.

Published on: Sep 28, 2022 04:47 PM