video : मुळ मालक ब्रह्मानंद पडळकर; आम्ही फक्त अतिक्रमण काढलं : गोपीचंद पडळकर
माहापालिकेकडून मालक ब्रह्मानंद पडळकरांना २४ तासाच्या आत हे अतिक्रम काढून घेण्यासंदर्भात सुचना मिळाल्या होत्या. त्याप्रमाणेच काल ते अतिक्रमण आम्ही काढून घेतल्याचं पडळकर म्हणाले.
मिरज : सांगलीतील मिरजमध्ये काल रात्री चार 4 हॉटले पाडली गेली. त्यानंतर यावर आता चांगलाच गदारोळ सुरू आहे. तर हॉटेल पाडल्यआ प्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे पोलीसांनी ब्रह्मानंद पडळकरांसह 100 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणी बोलताना, हॉटेल पाडण्यात आलेली जागेचा मुळ मालक हे ब्रह्मानंद पडळकर असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. येथील ५१ गुंट्याचा प्लॉट हा त्यांच्या नावे आहे. त्यावर हे अतिक्रमण झालं होतं. ते काढण्यासाठी माहापालिकेकडून वारंवार या हॉटेल धारकांना सांगण्यात आलं होतं.
तर माहापालिकेकडून मालक ब्रह्मानंद पडळकरांना २४ तासाच्या आत हे अतिक्रम काढून घेण्यासंदर्भात सुचना मिळाल्या होत्या. त्याप्रमाणेच काल ते अतिक्रमण आम्ही काढून घेतल्याचं पडळकर म्हणाले.