Bhagat Singh Koshyari on Aurangabad | कोश्यारींनी औरंगाबादमधील पाणीप्रश्न थेट मोदींसमोर मांडला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवानातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच काढला. तसेच पंतप्रधान मोदी है तो मुमकीन है म्हणत हा प्रश्न सोडवा असे आवाहन केले.
मुंबई – राज्यातील राजकारण हे गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या चारी बाजूने फिरताना दिसत आहे. येथे भाजपने जल आक्रोश मोर्चा काढून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच संभाजीनगर कधी करणार असा सवाल ही उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री ठाकरे यांना आपल्या औरंगाबादच्या सभेत योग्य उत्तर दिले होते. तसेच त्यासभेच्या आधी औरंगाबादच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी मिटींगा घेतल्या होत्या. दरम्यान आज हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राजभवानातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोरच काढला. तसेच पंतप्रधान मोदी है तो मुमकीन है म्हणत हा प्रश्न सोडवा असे आवाहन केले. त्यामुळे आता औरंगाबादच्या पाण्याच्या प्रश्न (Aurangabad water crisis) पुन्हा पेटणार असे दिसत आहे.