Ganoshotsav 2022 : राज्यपाल कोश्यारी गर्दीतून मार्ग काढत लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक

Ganoshotsav 2022 : राज्यपाल कोश्यारी गर्दीतून मार्ग काढत लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक

| Updated on: Sep 07, 2022 | 12:24 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. या गर्दीतून मार्ग काढत त्यांनी आज गणेशाचे दर्शन घेतले.

गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे संकट होते. दोन वर्षानंतर प्रथमच यंदा मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा होत आहे. भाविकांसह राज्यातील बडे नेते बाप्पाच्या दर्शनाला गर्दी करत असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. या गर्दीतून मार्ग काढत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.