5 % Reservation for Govinda | गोविंदांच्या नोकरीतील आरक्षणावरुन MPSC विद्यार्थी संतप्त-tv9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गोविंदांना नोकरीचे आरक्षण या घोषणेनंतर राज्य सरकारवर टिकीचे जोड उठलेली पहायला मिळत आहे. त्यातच आता राज्यसेवा आयोगाची परीक्षा देणारे विद्यार्थीही या निर्णयामुळे संतप्त झालेले आहेत.
गोविंदांना देण्यात येणाऱ्या नोकरीच्या आरक्षणावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर आता एमपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थीही संतप्त झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या त्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी खरमरीत टीका केली. त्यानंतर आता राज्य सरकारवर टिकीचे जोड उठलेली पहायला मिळत आहे. त्यातच आता राज्यसेवा आयोगाची परीक्षा देणारे विद्यार्थीही या निर्णयामुळे संतप्त झालेले आहेत. तर पब्जी आणि कॅंडी क्रश खेळणाऱ्या मुलांनाही सरकारी नोकरीत आरक्षण द्या अशा पद्धतीच्या संतप्त भावना एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर एमपीएससी समन्वय समितीने गोविंदांच्या नोकरीतील आरक्षणाला विरोध देखील केलेला आहे.
Latest Videos