पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान, पाहा...

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान, पाहा…

| Updated on: Jan 30, 2023 | 8:08 AM

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. पाच मतदारसंघात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप आणि शिंदेगट यांच्यात लढत होतेय. पाहा व्हीडिओ...

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. पाच मतदारसंघात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप आणि शिंदेगट यांच्यात लढत होतेय. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठीही आज मतदान पार पडत आहे. आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळतंय. शिक्षक मतदार संघासाठीही आज मतदान होतंय. उस्मानाबाद जिल्ह्यातील 25 मतदान केंद्रावर 5 हजार 213 शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. कंट्रोल युनिटच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्ट होणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान करण्यासाठी शिक्षकांना आज एक दिवसाची रजा मिळणार आहे.

Published on: Jan 30, 2023 08:08 AM