Gram Panchayat Election 2022 : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालात महिलांची बाजी! बिनविरोध निवडून आलेल्या 8 सरपंचांपैकी 6 महिला

Gram Panchayat Election 2022 : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालात महिलांची बाजी! बिनविरोध निवडून आलेल्या 8 सरपंचांपैकी 6 महिला

| Updated on: Sep 19, 2022 | 11:16 AM

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात संरपंच पदासाठी महिलांना पसंती मिळत असल्याचं नाशिक जिल्यात पाहायला मिळालं आहे. पाहा त्याच अनुषंगाने समोर आलेली महत्त्वाची आकडेवारी

नाशिक : नाशिक (Nashik District) जिल्ह्यात 8 सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यापैकी 6 महिला असल्याचं समोर आलंय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election Result 2022) निकालात स्थानिक पातळीवरचं काम पाहून मतदान मतदान करत असतात. अशातच आता बिनविरोध सरपंचपदी निवडून आलेल्या 8 जणांपैकी 6 पैकी महिला असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे गावातील लोकांची पसंती ही महिलांकडे नेतृत्त्व देण्यासाठी आहे, असं चित्र पाहायला मिळतंय. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी आज राज्यात पाहायला मिळतेय. 604 पैकी 51 ग्रामपंचायतींची निवडणूक ही बिनविरोध झालीय. त्यानंतर आता आज 547 ग्रामपंचायतींच्या निकालांकडे महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) वर्तुळाची नजर लागलीय. रविवारी या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील 22, दिंडोरीतील 50 आणि नाशिक तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये कुणाच्या वाट्याला विजयी गुलाल येतो, हे आज स्पष्ट होणार आहे.

Published on: Sep 19, 2022 11:00 AM