आतापर्यंत हाती आलेल्या निकालात भाजप नंबर वन, जाणून घ्या शिंदे, ठाकरे गटाच्या वाट्याला किती ग्रामपंचायती?
राज्यातील तब्बल 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरू आहे. जाणून घेऊयात आतापर्यंतच्या निकालाचे अपडेट्स
मुंबई : राज्यातील तब्बल 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरू आहे. रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले होते. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप हा नंबर वन पक्ष ठरला आहे. भाजपाने 63 ग्रामपंचायतींवर विजय मिळवलाय. तर भाजपानंतर ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठाकरे गटाने आतापर्यंत 41 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदे गटाने आतापर्यंत एकूण 39 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. तर काँग्रेसच्या वाट्याल एकूण 37 ग्रामपंचायती आल्या असून, राष्ट्रवादीने आतापर्यंत 35 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटात काँटे की टक्कर सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.
Published on: Oct 17, 2022 01:01 PM
Latest Videos