ग्रामपंचायतची सर्वसाधारण सभेत खुर्च्या फेकून हाणामारी, राड्याचे व्हीडिओ व्हायरल; एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत

ग्रामपंचायतची सर्वसाधारण सभेत खुर्च्या फेकून हाणामारी, राड्याचे व्हीडिओ व्हायरल; एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत

| Updated on: May 18, 2023 | 11:29 AM

विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकांच्या समोर ठाटलेले असतात. फक्त कारण मिळण्याची गरज मग काय खुर्ची आणि टेबल बी एकमेकांच्या अंगावर भिरकवले जातात. असाच राडा एका ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेत झाला आहे.

कोल्हापूर : ग्रामपंचायतची सर्वसाधारण सभा म्हटलं की अनेक ठिकाणी राडा हा ठरलेलाच असतो. यात विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकांच्या समोर ठाटलेले असतात. फक्त कारण मिळण्याची गरज मग काय खुर्ची आणि टेबल बी एकमेकांच्या अंगावर भिरकवले जातात. असाच राडा एका ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेत झाला आहे. त्याचे व्हीडिओ हे सोशल मीडियावर व्हायरलं होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर या प्रकरामुळे गावकरी ही संतापले आहेत. कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी येथील ग्रामसभेत चांगलाच राडा झाला. याचे व्हिडिओ आता समोर आले असून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर अक्षरशः सभागृहातील खुर्च्या फेकून मारल्या. या राड्यामध्ये एकाच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली आहे. अडसूळ आणि माने गटातील कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. अपेक्षित उत्तरे मिळत नसल्याचे म्हणत विरोधकांनी आवाज उठवला. यापूर्वी सुद्धा तब्बल 4 वेळा सभा तहकूब झाल्या आहेत. यावेळी सुद्धा सभेत राडा झाला.

Published on: May 18, 2023 11:29 AM