दोन उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे दोन उपसरपंचांची नियुक्ती करा, कोणी केली मागणी?

“दोन उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे दोन उपसरपंचांची नियुक्ती करा,” कोणी केली मागणी?

| Updated on: Jul 13, 2023 | 10:34 AM

राष्ट्रवादीमध्ये बंड करत अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सरकारकडे वेगळीच मागणी केली आहे.

पुणे: राष्ट्रवादीमध्ये बंड करत अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सरकारकडे वेगळीच मागणी केली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर ही ग्रामपंचायतमध्ये दोन उपसरपंच नियुक्तीला मंजुरी मिळून तशी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या सदस्यांनी केली आहे. या सदस्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असं पत्र पाठवलं आहे. तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे सदस्य अनिल भुजबळ यांनी ही मागणी केलीय.

Published on: Jul 13, 2023 10:34 AM