Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे भुजबळ यांनी अभिवादन केले. तसेच त्यांना राज्यात सुरू असलेलेल्या अजित पवार यांच्या वक्तव्यावर छेडले असता त्यांनी तो विषय टाळला
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई यांच्या नायगाव (जिल्हा सातारा) या जन्मगावी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली. तसेच त्यांना भुजबळ यांनी अभिवादन केले. त्यावेळी भुजबळांना माध्यम प्रतिनिधींनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता त्यांनी विषय टाळला.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे भुजबळ यांनी अभिवादन केले. तसेच त्यांना राज्यात सुरू असलेलेल्या अजित पवार यांच्या वक्तव्यावर छेडले असता त्यांनी तो विषय टाळला. तसेच आपल्याला या विषयावर बोलायचे नाही. तर पत्रकारांना या वादाच्या विषयातच जास्त इंटरेस्ट असल्याचेही भुजबळ म्हणाले.
त्याचबरोबर भुजबळ यांना पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले की सरस्वती श्रेष्ठ असे विचारले असता. यावेली त्यांनी सावित्रीबाई श्रेष्ठ असल्याचे सांगितलं. तसेच अजित पवार यांचा विषय गेला अता सावित्रीबाई यांच्या विषयी काही असेल तर सांगा असे म्हणाले.