‘माध्यमांसमोर इच्छा व्यक्त करण्यापेक्षा’; लोकसभेवरून उदय सामंत यांनी केसरकर यांना सुनावलं

‘माध्यमांसमोर इच्छा व्यक्त करण्यापेक्षा’; लोकसभेवरून उदय सामंत यांनी केसरकर यांना सुनावलं

| Updated on: Jul 15, 2023 | 11:41 AM

त्यांनी आपल्याला लोकसभा निवडणुका उमेदवारी दिली तर आपण लढू असे म्हटलं होतं. ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे युतीत आता खळबळ उडाली आहे.

नाशिक : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांसमोर इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी आपल्याला लोकसभा निवडणुका उमेदवारी दिली तर आपण लढू असे म्हटलं होतं. ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे युतीत आता खळबळ उडाली आहे. कारण येथे ठाकरे गटाचे विनायक हे विद्यमान खासदार आहेत. तर त्यांना युतीमध्ये अजित पवार गेल्याने धक्का बसू शकतो. तर येथे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा ही आहे. त्यामुळे येथे सध्या खिचडी झालेली दिसत आहे. यादरम्यान दीपक केसरकर यांनी आपल्याला संधी दिली तर आपण लढू अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून सामंत यांनी खडे बोल सुनावत जे शिवसेनेतील इच्छुक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तर जे भाजपचे इच्छुक आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सागांव असं म्हटलं आहे. तसेच केसरकर यांनी माध्यमांसमोर इच्छा व्यक्त करण्यापेक्षा मुख्यमत्र्यांकडे करावी असाही टोला लगावला आहे. याचबरोबर त्यांनी सिंधुदुर्गातील जो कोणी आमचा खासदार असेल तो मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 15, 2023 11:41 AM