Gudhi Padwa 2023 : ठाण्यातील नववर्षाच्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी; पाहा व्हीडिओ…
Gudhi Padwa 2023 : आज गुढी पाडव्यानिमित्त सर्वत्र मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील नववर्षाच्या स्वागत यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पाहा...
ठाणे : आज गुढी पाडवा आहे. त्यानिमित्त सर्वत्र मराठी नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. ठाण्यातील नववर्षाच्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी उपस्थितांना गुढी पाडवा अन् नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तमाम महाराष्ट्रवासियांना मी शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, आनंदाचा व समृद्धीचं जावो, याच शुभेच्छा देतो. कोरोनामुळे आपल्या सणावर व आपल्यावर निर्बंध आलेले होते. पण आज हा गुढीपाडव्याचा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
Published on: Mar 22, 2023 08:38 AM
Latest Videos