Gudhi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सजावट; कळसावर उभारली गुढी

Gudhi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सजावट; कळसावर उभारली गुढी

| Updated on: Mar 22, 2023 | 8:14 AM

Gudhi Padwa 2023 : मराठी नववर्ष आणि साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केली आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात येत आहे. मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली आहे.

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी राज्यभरातून मोठी गर्दी केली आहे. मराठी नवीन वर्ष आणि साडे तीन शुभ मुहूर्त असा योग साधतं भाविकांनी देवीचं दर्शन घेत आहेत. पहाटे ब्रह्म मुहूर्त असल्याने भाविकांनी देवीचे दर्शन घेत खण नारळ आणि साडी चोळीने ओटी भरली. देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा, वाकोजी बुवा यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण केला. तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. देवीच्या विधिवत पुजा आज पार पडल्या. तसंच भाविकांनीही मोठी गर्दी केली आहे.

Published on: Mar 22, 2023 08:14 AM