बाळासाहेबांचे खरे विचारांचे वारसदार राज ठाकरेच; बाळा नांदगावकर म्हणतात…
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बाळासाहेबांचे खरे विचारांचे वारसदार राज ठाकरेच असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यात आज गुढीपाडव्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा देखील आज शिवाजी पार्क मैदानावर मेळावा आहे. त्यामुळे राज ठाकरे आज जाहीर भाषणात काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. तर शिवाजी पार्क मैदानावर याची जय्यत तयारी केली आहे. यादरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बाळासाहेबांचे खरे विचारांचे वारसदार राज ठाकरेच असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.
यावेळी नांदगावकर यांनी, देशासाठी आणि राज्यासाठी काय महत्वाचे आहे हे विषय राज ठाकरे यांच्या भाषणात असतात. त्यामुळे आपल्यासह सर्वांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागलेली असते. तर भोंग्यावरून आलेल्या टिजर विचारले असता. ते म्हणाले भुंगे बंद व्हावेत ही बाळासाहेबांची इच्छा होती. ती राज ठाकरे यांनी पुर्ण केली. त्यामुळेच ते बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. तर हे आम्ही बोलत नाही लोकच बोलतात. राज ठाकरे यांची भाषणही बाळासाहेबांसारखे आसतात.