राज ठाकरे यांच्या सभेवरून संदीप देशपांडे यांचा राजकारण्यांना इशारा
मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षी एक नवीन संदेश घेऊन समोर येतो. यावेळी राज ठाकरे हे महाराष्ट्र सैनिकांना तसेच महाराष्ट्राला कोणता नवा संदेश याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे देशपांडे म्हणाले
मुंबई : गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उद्या (ता. २२) होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात काय भूमिका घेतात, कुणाला लक्ष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याटदरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राजकारण्यांनी इशारा दिला आहे.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षी एक नवीन संदेश घेऊन समोर येतो. यावेळी राज ठाकरे हे महाराष्ट्र सैनिकांना तसेच महाराष्ट्राला कोणता नवा संदेश याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे देशपांडे म्हणाले. तर महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या गलिच्छ आणि अतिशय खालच्या दर्जाचा राजकारणावर टीका केली. तर या राजकारणावर राज ठाकरे यांचे भाषण तुरटी फिरवण्याचं काम करेल असेही देशपांडे म्हणाले.
Published on: Mar 22, 2023 11:27 AM
Latest Videos