शिंदे हे लोकांच्या मनातले मुख्यमंत्री; शंभूराज देसाईंचा कोणावर नेम

शिंदे हे लोकांच्या मनातले मुख्यमंत्री; शंभूराज देसाईंचा कोणावर नेम

| Updated on: Mar 23, 2023 | 7:20 AM

शिंदे हे लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मागील 8 महिन्यात जे काम केलं आहे ते मागच्या अडीच वर्षात झालेला नाही.

मुंबई : राज्यात काल (22 मार्च) मोठ्या उत्साहत गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढण्यात आल्या. यावेळी अदित्य ठाकरे यांनी शोभा यात्रेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिंदे हे फक्त खुर्च्यांचे मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. त्याला शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे. तसेच आज गुढीपाडव्याच्या सण आहे. या दिवशी आपण चांगला बोलतो. किमान त्यांनी आजतरी चांगला बोलावं.

तर शिंदे हे लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मागील 8 महिन्यात जे काम केलं आहे ते मागच्या अडीच वर्षात झालेला नाही. शेतकरी मदद, परकीय गुंतवणूक, आद्योगिक गुंतवणूक, मुंबईचे सुशोभीकरण, नवीन प्रकल्प आणण्याचं काम शुरू आहे. जर शिंदे फक्त खुर्च्यांचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी ग्रामपंचायत आणि त्याच्यापूर्वी झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांचे परिणाम बघून घ्यावेत. शिंदे यांच्या नेतृत्वात किती जण निवडून आलेत. आणि आदित्यजींचा, ठाकरे गटाच्या नेतृत्वात किती जण निवडून आले आहेत

Published on: Mar 23, 2023 07:20 AM