मंत्रिमंडळ विस्तारावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; पहा काय म्हणतात,

मंत्रिमंडळ विस्तारावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; पहा काय म्हणतात,

| Updated on: Mar 23, 2023 | 7:35 AM

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे सरकार येऊन आता 8 महिने होत आहेत. यामध्ये आता पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही

पुणे : राज्यात काल (22 मार्च) मोठ्या उत्साहत गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढण्यात आल्या. पुण्यातही अशी शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी या शोभा यात्रेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सुचक वक्तव्य केल आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे सरकार येऊन आता 8 महिने होत आहेत. यामध्ये आता पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. विरोधकांकडून यावर सतत टीका होताना दिसत. यावरून चंद्रकांत पाटील यांनी हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अधिकारातला आहे. तर त्याबाबात आपल्याला काही माहित नसल्याचेही ते म्हणाले.

Published on: Mar 23, 2023 07:34 AM