बेईमानांचा पालापाचोळा उडून गेला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तर त्यांच्या या दाव्यानंतर ठाकरे गटानेही त्यांना प्रत्युत्तर दिलं
शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तर त्यांच्या या दाव्यानंतर ठाकरे गटानेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. बेईमानांचा पालापाचोळा उडून गेला, आमच्याकडे राहिलेले कडवट निष्ठावंत आहेत, अशा शब्दात हल्ला करत संजय राऊत यांनी पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा शिंदे गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यात वाद सुरू झाल्याचे दिसत आहे.
संजय राऊत सारख्या दगडाने आमच्या महालाचा संपूर्ण सत्यानाश करून टाकला. ते जळगावमध्ये 5 सीटा पाडणार होते, दोन-दोन दिवस बसले होते, पण एक माणूस वाचवू शकले नाहीत, अशा शब्दांत गुलाबराव यांनी राूतांवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंनी वेळीच ओळखावं, त्यांचे जे 20 (आमदार) आहेत ना त्यातले 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत, असा दावा पाटील यांनी केला.
त्यावर, तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का असे म्हणत संजय राऊत यांनीही चोख प्रत्युत्तर देत पाटील यांना सुनावलं.