असं वाटतं मीच युवासेनेचा जिल्हाप्रमुख, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना टोला

“असं वाटतं मीच युवासेनेचा जिल्हाप्रमुख”, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना टोला

| Updated on: Jun 06, 2023 | 4:52 PM

जळगावच्या पारधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन 57 वा सोहळा पार पडला.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

जळगाव : जळगावच्या पारधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सोहळा पार पडला. या सोहळ्यात त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.”माझ्या वाढदिवसाप्रसंगी आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात गोरगरिबापासून मला शुभेच्छा येत आहेत. एक प्रकारे माझ्या गावात यात्रा असल्याची स्थिती आहे. पुढे जनता माझ्या पाठीशी आहे. डरने की बात नहीं. माझ्यासोबत म्हातारे लोकं आहेतच पण तरुणमंडळी सुद्धा बसले आहेत. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की, मी युवा सेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे मला लगीन करायला पाहिजे”, असा टोला गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. “अशीच गर्दी माझ्या नाटकांना राहायची, ज्या नाटकात मी भाग घेतला,त्या ठिकाणी ग्राउंड पॅक व्हायचं. त्या संजय राऊत यांना फक्त मी एकटाच दिसतो, म्हणून थुकायला लागले आहेत. संजय राऊत बावळट माणूस आहेत. आजच हा पक्ष फुटला का ? याआधी कोणता पक्ष फुटला नाही का? 40 लोकांना संपवून टाकू अशा म्हणणाऱ्या संजय राऊत यांना या आमदारांनी मतदान केलं”,अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

Published on: Jun 06, 2023 04:52 PM