अजित पवार यांच्या बंडाची कल्पना होता का? पाहा काय म्हणाले गुलाबराव पाटील…
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीतल्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी यावेळी राष्ट्रवादीतला मोठा गट फोडल्याचं समोर आलं आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून दुपारी शपथ घेतली.
मुंबई: राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीतल्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी यावेळी राष्ट्रवादीतला मोठा गट फोडल्याचं समोर आलं आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून दुपारी शपथ घेतली. यामुळे राज्यात आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा तिन्ही पक्षाचे मिळून एकत्र सरकार झाले आहे. मात्र अजित पवार यांच्या भूमिकेवर शिवसेनेच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार सोबत येणार याची माहिती नव्हती, शपथविधीच्या दिवशीत अजितदादा सोबत असल्याचं समजलं. सकाळच्या शपथविधीनंतर वाटलं नव्हतं की अजितदादा पुन्हा असं करतील,” असं गुलाबराव पाटील म्हणाले.
Published on: Jul 04, 2023 11:22 AM
Latest Videos