बिग बॉसमध्ये जाणार का?, गुलाबराव पाटील म्हणाले…

| Updated on: Sep 30, 2022 | 12:46 PM

मंत्री गुलाबराव पाटील बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्याविषयी आम्ही त्यांनाच विचारलं तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल केऱ्हाळे, TV9 मराठी, प्रतिनिधी, जळगाव : शिंदेगटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्याविषयी आम्ही त्यांनाच विचारलं तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशी संधी कुणालाही मिळत नाही. यासारखी सोन्याची संधी नाही. मला बिग बॉसमध्ये बोलावलं तर निश्चित जाईल, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणालेत. माझं नाव चर्चेत आहे ऐकून मला माझ्या बालपणीची आठवण झाली.शाळेत असताना मी नाटकात, गाण्यांच्या स्पर्धांमध्ये घ्यायचो. त्यामुळं मला बिग बॉसमध्ये बोलावलं तर मी निश्चितपणे जाईल, असं ते म्हणालेत.

Published on: Sep 30, 2022 12:46 PM