खाते वाटपावरून महायुतीत बिनसलं? शिवसेनेचा आमदार स्पष्टच म्हणाला, सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यामुळे...

खाते वाटपावरून महायुतीत बिनसलं? शिवसेनेचा आमदार स्पष्टच म्हणाला, “सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यामुळे…”

| Updated on: Jul 13, 2023 | 1:39 PM

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि खातेवाटपावरून मोठ्या घडामोडी घडत आहे. याच पार्शभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि खातेवाटपावरून मोठ्या घडामोडी घडत आहे. आपल्याला अर्थखातं मिळावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत. तर अजित पवार यांना अर्थखातं मिळू नये यासाठी शिवसेना विरोध करत आहे. यामुळे अजित पवार नाराज असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक भूमिका घेतली आहे. याच पार्शभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यामुळे खाते वाटपात निश्चितच थोडी गडबड होणार आहे. त्यामुळे खाते वाटपात थोडा विलंब होतोय. अर्थ खात्याच्या बाबतीतही वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. खाते वाटपावर कोणाचीही नाराजी नसेल. पण आता सर्व वावड्या उठवल्या जात आहेत.”

Published on: Jul 13, 2023 01:39 PM