Gulabrao patil : बाळासाहेब हे देशाचे म्हणत, गुलाबराव पाटील यांनी दिलं उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर

Gulabrao patil : बाळासाहेब हे देशाचे म्हणत, गुलाबराव पाटील यांनी दिलं उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर

| Updated on: Mar 06, 2023 | 1:52 PM

Gulabrao patil on Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत. मात्र ते या देशाचे आणि हिंदू समाजाचे नेते होते. ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल.

Gulabrao patil on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांचवेळी शिंदेंसह त्यांनी शिंदेबरोबर गेलेल्या नेत्यांवरही टीका केली होती. त्यावरून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्वव ठाकरे यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखिल उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांनी, बाळासाहेबांच्या नाव वापरू नका हे उद्धव ठाकरे शिंदे गटाला उद्देशून पाचव्या सहाव्या वेळेस बोलले आहेत. त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी, असा सवाल उपस्थित करत हे चुकीचं असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर महापुरुषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. बाळासाहेब त्यांचे वडील आहेत. पण त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही. ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 06, 2023 01:52 PM