Gunaratna Sadavarte : एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती

Gunaratna Sadavarte : एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती

| Updated on: Apr 10, 2025 | 2:49 PM

एसटी महामंडळाकडून राज्य शासनाकडे मागितलेले १ हजार कोटी रूपये जर सरकारने दिले तरच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे १०० टक्के होणार असल्याची माहिती मिळतेय. अशातच गुणरत्न सदावर्ते यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मार्च महिन्याचं ५६ टक्केच वेतन जमा करण्यात आलं आहे. तर उर्वरित वेतनाची रक्कम जमा कऱण्यात यावी, अशी मागणी देखील एसटी कर्मचाऱ्यांकडून कऱण्यात येत असताना पूर्ण पगार द्या, अन्यथा आंदोलन करू, असा थेट इशारच एसटी कर्मचारी संघटनांकडून देण्यात आला आहे. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर भाष्य कऱण्यात आले आहे. ‘कष्टकऱ्यांच्या श्रमाचे पैसे वेळेवर मिळायला हवे याला कोणताही अपवाद नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या तो हक्काचा आणि कष्टाचा पैसा आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार नाही झाला तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात.’, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, आठ ते दहा दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होईल, अशी मोठी माहिती दिली. यासह एसटी विलिनीकरणाचा लढा आम्ही सोडलेला नाही, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Apr 10, 2025 02:48 PM