Special Report | श्रमिकांच्या वकिलाची ‘श्रीमंती’ चर्चेत-tv9
कष्टकरी आणि श्रमिकांचे वकिल म्हणून ज्या सदावर्तेंनी एसटी संप गाजवला, त्याच सदावर्तेंची संपत्ती आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आलीय. सदावर्तेंच्या मुंबईतल्या घरातून चक्क नोटा मोजण्याचं मशीन मिळाल्यामुळे खळबळ उडालीय.
कष्टकरी आणि श्रमिकांचे वकिल म्हणून ज्या सदावर्तेंनी एसटी संप गाजवला, त्याच सदावर्तेंची संपत्ती आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आलीय. सदावर्तेंच्या मुंबईतल्या घरातून चक्क नोटा मोजण्याचं मशीन मिळाल्यामुळे खळबळ उडालीय. काय आहे नेमकं प्रकरण, आरोप काय होतायत आणि सदावर्तेंच्या कोणकोणत्या संपत्तींची पोलिसांनी पाहणी केलीय, एसटी आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांकडून जे पैसे घेतले गेले., त्यातून सदावर्तेंनी संपत्ती जमवल्याचा
संशय पोलिसांनी वर्तवलाय. सध्या जे ३ मुद्दे पुढे येतायत., त्यातून सदावर्तेंचा पाय अजून खोलात जाताना दिसतोय. पहिलं म्हणजे नोटा मोजण्याचं मशीन, सरकारी वकिलांच्या दाव्यानुसार हे मशीन सदावर्तेंच्या घरातून जप्त झालंय. दुसरं म्हणजे मागच्या काही काळात सदावर्तेंनी खरेदी केलेल्या संपत्या. आणि तिसरं म्हणजे सदावर्तेंच्या घरातून जप्त केलेली एक डायरी…. सूत्रांच्या माहितीनुसार या डायरीत अनेक महत्वाच्या व्यवहारांचा उल्लेख आहे.