Ad Jayashree Patil : आम्ही आमच्या कष्टानं मालमत्ता खरेदी केली होती : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील

Ad Jayashree Patil : आम्ही आमच्या कष्टानं मालमत्ता खरेदी केली होती : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील

| Updated on: Apr 30, 2022 | 8:52 PM

तर सध्याचे सरकार हे नापास सरकार आहे. हे सरकार संविधानिक वागत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच असे नाही केले तर मोगलाईसारखे अत्यार राज्यात होत राहतील, असंही अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाच्या कटात सहभाग असल्याचा आणि आंदोलकांना चिथावणी दिल्याचा आरोप अ‍ॅड. जयश्री पाटील यांचे पती अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झाला. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणेसह आणखीन 3 जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे सदावर्ते यांना त्या त्या जिल्ह्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर तब्बल 18 दिवसांनंतर त्यांची जामिनावर सुटका केली. तर अ‍ॅड. जयश्री पाटील यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) सोमवारी दिलासा देत 29 एप्रिलपर्यंत अटकेपासून हंगामी संरक्षण दिले होते. यादरम्यान जयश्री पाटील सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना सरकार हार पचवू शकले नाहीत म्हणून मला, पतीला फसवण्यात आलं असे म्हटलं आहे. तसेच जयश्री पाटील सदावर्ते (Adv. Jayashree Patil) यांनी सत्यमेव जयते असे म्हटलं आहे.